Thu, Sep 20, 2018 01:59होमपेज › Goa › माजी मंत्री प्रकाश फडते यांचे निधन

माजी मंत्री प्रकाश फडते यांचे निधन

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 11:38PM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

मयेचे माजी आमदार तथा माजी शिक्षण मंत्री प्रकाश फडते (वय 63) यांचे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जुने गोवे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. 

फडते यांचा जन्म कुंभारजुवे येथे 9 जानेवारी 1954 रोजी झाला. भाजप मये मतदारसंघाचे ते मंडळ अध्यक्ष होते. 1999 साली ते भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी शशिकलाताई काकोडकर यांचा पराभव केला होता. 2002 पर्यंत ते पर्रीकर सरकारमध्ये मंत्री होते. गोवा क्रिकेट संघटनेचे ते सदस्य होते.