होमपेज › Goa › विदेशी नागरिकास 1 लाखांचा दंड

विदेशी नागरिकास 1 लाखांचा दंड

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:17PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जर्मन नागरीक पीटर सेलचॉव याला उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मागील आठवड्यात दिलेल्या निवाड्यावेळी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पेडणे पोलिसांनी दि. 14  फेब्रुवारी 2011 रोजी खालचावाडा - हरमल  येथून अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी पीटर सेलचॉव याला अटक केली होती. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचा 37.650 ग्रॅम चरस व 8.321 ग्रॅम एमडीएमए अमली पदार्थ जप्त करून त्याच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक  कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले होते.

आरोपपत्राच्या सुनावणीवेळी, संशयित पीटर याचा पेडणे येथे अपघात झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी गाोमेकॉ इस्पितळात दाखल केले होते. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला अर्धांगवायूचा झटका येऊन त्याच्या शरिराची डावी बाजू निकामी झाली होती. जर्मन उच्चायुक्तालयाचे गोव्यातील प्रतिनिधी डिन मिनेझिस यांनी पत्राद्वारे जिल्हा सत्र न्यायालयास ही माहिती देऊन याबाबत वैद्यकीय पुरावे सादर केले होते. याची दखल घेत जिल्हा सत्र न्यायालयाने पीटर याला 1 लाख रुपयांची दंडात्मक शिक्षा सुनावली.