होमपेज › Goa › सुनील गर्ग विरोधातील  याचिकेवर निवाडा राखून

सुनील गर्ग विरोधातील  याचिकेवर निवाडा राखून

Published On: Dec 18 2017 2:30AM | Last Updated: Dec 18 2017 1:04AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोवा पोलिस खात्याचे माजी पोलिस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधात लाच प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाला एफआयआर नोंदवण्याचे निर्देेश देण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील निवाडा  पणजी सत्र न्यायालयाने 22 डिसेंबरपर्यंत  शनिवारी (दि. 16) झालेल्या सुनावणीवेळी  राखून ठेवला आहे. वास्को येथील व्यावसायिक  मुन्नालाल हलवाई यांनी पणजी सत्र न्यायालयात  सदर याचिका दाखल केली आहे.

एका प्रकरणात गुन्हा नोंद करण्यासाठी तत्कालीन पोलिस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी आपल्याकडून 5.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप हलवाई यांनी केला आहे. या लाच प्रकरणी सुनील गर्ग यांच्याविरोधात हलवाई यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे  तक्रार केली होती. मात्र, अनेक महिने उलटले तरी अजूनही पोलिसांकडून गर्ग विरोधात एफआयआर नोंद करण्यात आलेला नाही. त्यामुळे अखेर हलवाई यांनी   न्यायालयात धाव घेऊन गर्ग यांच्या विरोधात लाच प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाला एफआयआर नोंदवण्याचे निर्देेश देण्याची मागणी केली आहे. सक्षम अधिकारणीकडून  मंजुरी मिळाल्याशिवाय गर्ग यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाऊ शकत नसल्याचे पोलिसांनी सुनावणीवेळी न्यायालयात सांगितले. या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला असून निवाडा राखून ठेवण्यात आला आहे.