Wed, Apr 24, 2019 12:27होमपेज › Goa › सेरेंडिपिटी आयोजकांना न्यायालयाची नोटीस

सेरेंडिपिटी आयोजकांना न्यायालयाची नोटीस

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 12:17AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पणजीत नुकत्याच पार पडलेल्या सेरेंडिपिटी कला महोत्सवाच्या  आयोजकांना   पणजी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी  नोटीस बजावली आहे. सेरेंडिपिटी महोत्सवादरम्यान कांपाल पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमामुळे  पर्यावरण नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा ठपका ठेवून आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेटये यांनी  पणजीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर याचिका दाखल केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

पणजीत  15 ते  22 डिसेंबर दरम्यान   सेरेंडिपिटी  कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवानिमित  आदिलशहा पॅलेस, कांपाल मैदान, आयनॉक्स परिसराबरोबर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  मात्र, कांपाल येथे या कार्यक्रमामुळे सीआरझेड नियमांचे अर्थात पर्यावरण नियमांचे  उल्लंघन, तसेच  5 फेब्रुवारी 2015 रोजी  राष्ट्रीय हरित लवादाच्या अंतरिम आदेशाचा भंग झाला आहे.  या अंतरिम आदेशात   भरती रेषेच्या 100 मीटर अंतरापर्यंत  कुठलेही बांधकाम उभारले जाऊ शकत नाही, असे नमूद करण्यात आले आहे.