Sun, Oct 20, 2019 12:21होमपेज › Goa › ग्राहक हक्क रक्षणासाठी सदैव तत्पर

ग्राहक हक्क रक्षणासाठी सदैव तत्पर

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 1:23AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहणार असून ग्राहकांनीही वस्तू किंवा सेवा खरेदी करतेववेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्यावसायिकांकडून कोणताही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, अशा इशारा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागातर्फे मंगळवारी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित कार्यक्रमात दिला. मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ग्राहकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या सहकार्याची गरज असून प्रत्येक व्यवहार पारदर्शक व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील. या विषयी जागरूकता करण्यासाठीही पावले उचलली जातील.

नागरी पुरवठा विभागाचे सचिव रुपेश कुमार ठाकूर म्हणाले, ग्राहक हक्क कायदा हा 35 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. या कायद्यामुळेच ग्राहकांना कोणताही व्यावसायिक फसवू शकत नाही. ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षिततेचा मोठा प्रश्‍न असतो. ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकाची वैयक्तिक माहिती कितपत सुरक्षित असते, हा मोठा प्रश्‍न असतो. त्यामुळे याबाबत ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी.व्यासपीठावर अमिता सलत्री, फ्रेंकलिन फेर्राव व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शबिर अली यांनी उपस्थितांना ग्राहक हक्कांबाबत मार्गदर्शन केले.