Thu, Feb 21, 2019 22:25होमपेज › Goa › राज्यात थंडीचा कडाका

राज्यात थंडीचा कडाका

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:52PM

बुकमार्क करा

 पणजी : प्रतिनिधी

राज्यात थंडीचा कडाका वाढत असून  रविवारी  (दि. 24) किमान तापमान  18 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले. गेल्या दोन दिवसांपासून  राज्यात किमान तापमान  18.8 ते 19 अंश सेल्सियस इतकी नोंद झाल्याची माहिती पणजी वेधशाळेच्या सूत्रांनी दिली.

येत्या 48 तासांत किमान तापमान  19 अंश सेल्सियसपर्यंत तर कमाल तापमान 34 अंश सेल्सियसपर्यंत   कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिने राज्यात थंडी जाणवते. यावर्षीदेखील बर्‍यापैकी थंडीचा कडाका जाणवत आहे. विशेषतः मागील दोन ते तीन दिवसांपासून  किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातदेखील घट झाली  आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत   किमान तापमानात 1.7 डिग्री घट नोंद झाली आहे.