Sun, Feb 17, 2019 01:05होमपेज › Goa › नारळ सवलत दरात  योजनेचा आज प्रारंभ

नारळ सवलत दरात  योजनेचा आज प्रारंभ

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 1:47AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात नारळाचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले असून लोकांना सवलतीच्या दरात नारळ उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या योजनेला गुरुवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी पणजी व मडगाव येथे प्रारंभ होत आहे. या योजनेचे उद्घाटन पणजीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव केळकर यांनी दिली.

पणजीत आल्तिनो येथील फलोत्पादन केंद्रात सकाळी 11 वाजता या योजनेचे उद्घाटन होईल. यावेळी गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर,  माजी आदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये   उपस्थित असतील. मडगाव येथे  कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन होणार आहे.  

बाजारात मध्यम आकाराचा नारळ 40 ते 50 रुपयांत विकला जात असून हा दर परवडणारा नाही. नारळाचे दर सर्वसामान्य गोमंतकीयांना परवडणारे नसून नारळाची टंचाई भासत आहे. त्यामुळे एलपीजी कार्डधारकांना प्रतिमहिना 30 नारळ देण्यात येणार आहेत, असे मंत्री सरदेसाई यांनी प्रजासत्ताकदिनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे या योजनेची आजपासून अंमलबजावणी होणार आहे.