Thu, Jul 18, 2019 06:16होमपेज › Goa › नागरी पुरवठा खात्यात लवकरच नोकरभरती

नागरी पुरवठा खात्यात लवकरच नोकरभरती

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 1:23AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या  नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यात नोकरभरतीची  गरज असून अपुर्‍या मनुष्यबळामुळे खात्यातील कामे मार्गी लावण्याच्या प्रयत्नांना   यश येत नव्हते.   मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी याबाबत नुकतीच चर्चा झाली असून लवकरच खात्यात  नोकरभरती होणार आहे, अशी माहिती नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी  बोलत होते. 

मंत्री गावडे म्हणाले, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यात नवा कर्मचारी वर्ग असावा, असा आमचा प्रयत्न आहे. या खात्यात  कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने काही कामे रखडली आहेत. त्यामुळे खात्यातील कर्मचार्‍यांच्या संख्येचा अभ्यास करून या खात्यात नोकरभरतीसंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी नुकतीच आपण चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेतून सकारात्मक निर्णय झाल्याने खात्यात नोकरभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.