Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Goa › पणजीजवळ साकारतोय ‘चाइल्ड सेंट्रिक होम्स’ प्रकल्प

पणजीजवळ साकारतोय ‘चाइल्ड सेंट्रिक होम्स’ प्रकल्प

Published On: Jan 16 2018 2:29AM | Last Updated: Jan 16 2018 2:13AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास होण्याच्यादृष्टीने उपयुक्त असा राज्यातील पहिला ‘चाइल्ड सेंट्रिक होम्स’ प्रकल्प अर्थात ‘रिव्हर ऑफ जॉय’ ‘गेरा डेव्हलपमेंट्स’च्या वतीने पणजीलगत उभारण्यात येत आहे, असे व्यवस्थापकीय संचालक  रोहित गेरा यांनी सांगितले.  47  वर्षांची परंपरा असलेल्या ‘गेरा डेव्हलपमेंट्स’ ने   या  प्रकल्पासाठी   फुटबॉलपटू बायचुंग भूतिया, टेनिसमध्ये ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू  महेश भूपती आणि  आधुनिक डान्स गुरू शामक दावर  यांना ‘अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून नियुक्त केले असून ते मुलांच्या क्रीडा, कला, संगीत, अभिनय आदी गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने उपक्रम राबवून मार्गदर्शन करणार असल्याचे  रोहित गेरा यांनी सांगितले.

येथील एका हॉटेलात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोहित गेरा बोलत होते. त्यांच्यासह बायचुंग भूतिया, महेश भूपती आणि शामक दावर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. ‘गेरा डेव्हलपमेंट्स’तर्फे पुणे, पणजी शहरांत अनेक निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत.   रोहित गेरा म्हणाले, या प्रकल्पातील विविध वैशिष्ट्यांसह भारतातील प्रतिथयश व्यक्तींच्या सहकार्यातून मुलांना बौद्धिक, शारीरिक विकासासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या अभिनव संकल्पनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून 364 पैकी 190 घरांची विक्री झाली आहे. प्रकल्पाची घोषणा होताच 50 टक्क्यांहून अधिक घरांची विक्री होणे ही गेरा डेव्हलपमेंटसाठी  अभिमानास्पद बाब आहे.

गेराच्या या नव्या प्रकल्पात घर घेणार्‍या ग्राहकांना आपल्या मुलांच्या आवडीच्या क्षेत्रात सर्वोत्तम प्रशिक्षण अकादमींसमवेत 3 वर्षांचा मोफत करार करण्याची संधी दिली जाणार आहे. महेश भूपती म्हणाले, बाल व तरुण पिढीतील कौशल्य हेरणे व त्यांच्या विकासाला चालना देऊन  ‘स्टार’ घडवण्यासाठी ही संकल्पना एक चांगला पर्याय ठरू शकते.  या प्रकल्पात राहणार्‍यांसाठी महेश भूपती टेनिस अकादमीच्या सुविधा उपलब्ध करून टेनिसमध्ये करिअर घडवण्यासाठी   संधी उपलब्ध केली जाणार आहे. शामक दावर म्हणाले, या प्रकल्पात राहणार्‍यांसाठी आपला 30 वर्षांचा नृत्यक्षेत्रातील अनुभव उपलब्ध करणार आहे. मुलांमध्ये नवा विश्‍वास निर्माण करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास  करण्याचा आपला  प्रयत्न राहणार  आहे.