होमपेज › Goa › मासिक पाळीसंदर्भात जागृतीसाठी ‘भूमी’ प्रकल्प

मासिक पाळीसंदर्भात जागृतीसाठी ‘भूमी’ प्रकल्प

Published On: Feb 04 2018 2:16AM | Last Updated: Feb 04 2018 2:16AMपणजी : प्रतिनिधी

महिलांमधील मासिक पाळीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी साखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटने ‘भूमी’ नावाने प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पा अंतर्गत शाळा, महाविद्यालयात जाऊन मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींंना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेविका सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.  सावंत म्हणाल्या, की  साई नर्सिंग इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी यापूर्वी पाळी येथील ताराबाई दळवी हायस्कूल व टागोर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम घडवून आणला आहे. सुर्ला व न्हावेली येथील सरकारी विद्यालयात असे उपक्रम राबविले आहेत. सध्या हा प्रकल्प डिचोली तालुक्या पुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे.

मासिक पाळी आपल्यानंतर युवतींनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत जनजागृती होणे आवश्यक   आहे. त्याबाबत युवतींमध्ये जागृती घडवून निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन करुन सुंदर आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. मासिक पाळी संदर्भात शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी साई नर्सिंग इन्स्टिट्यूट शिक्षक संचालकांना पत्र करणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.  पत्रकार परिषदेत कल्याण सावंत, रेश्मी गावकर, सायली नाईक व अन्य उपस्थित  होत्या.