Thu, Jun 20, 2019 01:29होमपेज › Goa › सहा महिन्यांत आल्तिनो येथील सौंदर्यीकरण

सहा महिन्यांत आल्तिनो येथील सौंदर्यीकरण

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:36AM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

आल्तिनो येथील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करण्यासाठी 73 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. येत्या 6 महिन्यात हे काम पूर्ण होणार, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. आल्तिनो येथील वाहतूक पोलिस मुख्यालयाच्या समोरील खुल्या जागेच्या सौंदर्यीकरणाची पायाभरणी  केल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. अमृत योजनेअंतर्गत हे विकामकाम हाती घेण्यात आले आहे.  पायाभरणीवेळी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे संचालक सिध्दार्थ कुंकळ्येकर, नगरसेवक पुंडलिक राऊत देसाय व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले की, स्मार्ट सिटी योजने अंतर्गत दर आठवड्याला एक विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

आल्तिनोच्या जागेचे सौंदर्यीकरण केल्यानंतर स्वत: नागरिक या विकासकामाची देखरेख करणार आहेत. कुंकळ्येकर यांनी सांगितले की, आल्तिनो येथील नागरिकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुलांसाठी खेळण्याचे साहित्य आणि वृद्धांना चालण्यासाठी जागा उपलब्ध केली जाणार असून  इतर लोकांनाही याचा वापर करता येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले की, दोनापावल येथील कॉन्वेन्शन केंद्र उभारण्यासंदर्भात सल्लागार समिती 12 जानेवारी 2018 रोजी सरकारकडे अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.