Wed, Apr 24, 2019 11:51होमपेज › Goa › पणजी बाजारात मनपाची कारवाई, साहित्य जप्त

पणजी बाजारात मनपाची कारवाई, साहित्य जप्त

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:33AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

पणजी बाजारात दुकानाबाहेर पदपथावर अतिक्रमण करणार्‍या दुकानदारांवर शुक्रवारी मनपाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधीत दुकानदारांचे पदपथावर ठेवलेले सामान मनपा कर्मचार्‍यांनी जप्त केले. दुकानदारांकडून केल्या जाणार्‍या या अतिक्रमणाविरोधात मनपाची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पणजी बाजार समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर यांनी दिला आहे. पणजी बाजारात नाताळानिमित मोठ्या प्रमाणात  साहित्य दाखल  झाले असून हे साहित्य दुकानांबाहेर पदपथावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना चालण्यास अडचण होत असल्याची तक्रार पालिकेकडे आल्यामुळे या तक्रारीची दखल घेत बाजारातील सहा दुकानांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.  अतिक्रमण करणार्‍या दुकानादारांवर दंडात्मक कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत दिले जाईल, असे मडकईकर यांनी  सांगितले.