Thu, Apr 25, 2019 16:22होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर यांची पंतप्रधानांशी दिल्लीत भेट

मुख्यमंत्री पर्रीकर यांची पंतप्रधानांशी दिल्लीत भेट

Published On: Jan 09 2018 2:13AM | Last Updated: Jan 09 2018 2:13AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सोमवारी ही भेट घेतली. पर्रीकर यांनी म्हादई जलतंटा, कोळसा हाताळणी, नद्यांचे राष्ट्रीयीकरण आदी विषयांची पंतप्रधानांना माहिती दिली. यंदाच्या वर्षी पणजीतील मांडवी नदीवरचा तिसरा तथा राज्यातील पहिला केबलस्टेड पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी करावे, अशी विनंती पर्रीकर यांनी केली असल्याचे सूत्रांनी  सांगितले.  

दरम्यान, राज्यात रोजगारभिमुख उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापार विकास आणि प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत केले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या व्यापार विकास आणि प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीला  मुख्यमंत्री तथा उद्योगमंत्री पर्रीकर सहभागी होते. या बैठकीत विविध राज्यांतील उद्योगमंत्री, खात्याचे सचिव व उद्योग प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर रविवारी रात्री दिल्लीला रवाना झाले होते.