Thu, Apr 25, 2019 14:16होमपेज › Goa ›

1021 बार परवान्यांच्या नूतनीकरणाला मान्यता  

1021 बार परवान्यांच्या नूतनीकरणाला मान्यता  

Published On: Apr 05 2018 2:27AM | Last Updated: Apr 05 2018 2:21AMपणजी : प्रतिनिधी

 राज्यातील शहरी भागालगतची पालिका क्षेत्रालगतची  तसेच ‘ओडीपी’ क्षेत्रातील गावांतील 1021 बारच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.   उर्वरित सुमारे 311 बारबाबत प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र चर्चा करून  तीन मंत्र्यांची समिती त्यावर निर्णय घेईल, असे  नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.  महामार्गालगत मद्यविक्रीबाबत सर्वोच्च न्यायालयाने 23 फेब्रुवारी-2018 रोजी दिलेल्या  आदेशात एखाद्या राज्यातील महामार्ग शहरी भागातून   अथवा पालिका क्षेत्रातून जातो तेथील मद्यालयांचे 

नूतनीकरण करण्यास मान्यता दिली होती. यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित राज्यांना देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने नूतनीकरण न केलेल्या 1332 बारच्या परवान्यांवर निर्णय घेण्यासाठी  नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई व महसूल मंत्री रोहन खंवटे या तीन मंत्र्यांची समिती स्थापन करून त्या समितीला सदर निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. 

तीन मंत्र्यांच्या समितीने दिलेल्या आदेशानुसार अबकारी खात्याने जनगणनेनुसार ‘क्लस्टर व्हिलेजीस’ असणार्‍या पालिका क्षेत्रालगतची गावे, बाह्य विकास आराखड्यात (ओपीडी) येणारी गावे तसेच अन्य विकसित परिसराची यादी सादर केली. या विषयी सदर तीन मंत्र्यांच्या समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत, 1021 बारच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यास हरकत नसल्याचे ठरवून अबकारी खात्याला नूतनीकरणाचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली. राज्यातील सुमारे 1021 बारच्या परवान्यांचे नूतनीकरण होईल. उर्वरित 311 परवान्यांचे नूतनीकरण ‘केस टू केस’ पद्धतीने ठरवले जाणार आहे. मोपा सारख्या नव्या पीडीएतील भागातील बारच्या परवान्यांचे नूतनीकरण पुढे होऊ शकत असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. 
 

 

 

tags : Panaji ,news,Villages,ODP ,area ,1021, Bar ,License, Renewal, Decision,