Sat, Nov 17, 2018 21:09होमपेज › Goa › राज्यातील नद्यांचे मास्टरप्लान तयार

राज्यातील नद्यांचे मास्टरप्लान तयार

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील म्हादई, जुवारी, तळपण व गालजीबाग या चार नद्यांसाठी जलस्रोत खात्याकडून मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. तांत्रिक अहवालानंतर या प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी सभागृहात  प्रश्‍नोत्तर तासात दिली.
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी विचारलेल्या राज्यात पाण्याची कमतरता भासत आहे का, या प्रश्‍नाला मंत्री पालयेकर यांनी वरील उत्तर दिले.

 मंत्री पालयेकर म्हणाले,  पाणीपुरवठ्यासाठी जलस्त्रोत खात्याकडून राज्यात बंधारे, धरण उभारण्याबरोबर विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. राज्यातील म्हादई, जुवारी, तळपण व  गालजीबाग  या चार नद्यांसाठी मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. या मास्टरप्लान अंतर्गत पाण्या संदर्भातील मागण्या, पाणी साठवण्याची क्षमता आदी कामे केली जाणार आहेत. याशिवाय खात्याकडून टास्क फोर्सही स्थापन करण्यात आली आहे. तिलारी कालव्याचे 10 किलोमीटर अंतराचे काम बाकी आहे. सदर प्रकल्प 120 कोटी रुपयांचा असल्याचे त्यांनी सांगितले.