Tue, Oct 22, 2019 02:04होमपेज › Goa › संध्या होबळेंच्या नावावरील अबकारी परवाने निलंबित

संध्या होबळेंच्या नावावरील अबकारी परवाने निलंबित

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 02 2018 11:56PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

रायबंदर पणजी कॉजवेवरील  हॉटेलला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांच्या पत्नी संध्या होबळे यांच्या नावे असलेले दोन  अबकारी परवाने  अबकारी  आयुक्त अमित सतिजा यांनी मंगळवारी   निलंबित  केले. या प्रकरणी  सुनावणी   23 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.  सतिजा यांनी 21 डिसेंबर 2017 रोजी संध्या होबळे यांना  दोन  अबकारी परवाने निलंबित का केले जाऊ नयेत, अशी कारणे दाखवा नोटीस  बजावली होती.  या नोटिसीला त्यांना  सात दिवसात  उत्तर देण्यास बजावण्यात आले होते.   भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  अनिल होबळे, त्यांच्या  पत्नी संध्या होबळे व पुत्र मिलिंद होबळे यांच्याविरोधात पणजीच्या महिला पोलिस स्थानकात 12 जुलै 2017 रोजी सुनेचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून  10 नोव्हेंबर रोजी पणजीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर होबळेंविरोधात आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे.