Mon, Sep 16, 2019 17:48होमपेज › Goa › ‘सुपरमून’ किनार्‍यांवर दक्षतेचा इशारा

‘सुपरमून’ किनार्‍यांवर दक्षतेचा इशारा

Published On: Dec 31 2017 2:11AM | Last Updated: Dec 31 2017 2:06AM

बुकमार्क करा
पणजी ः प्रतिनिधी

राज्यातील समुद्रकिनार्‍यांवर 2 आणि 31 जानेवारी 2018 रोजी ‘सुपरमून’ मुळे समुद्राच्या पातळीत वाढ होणार असल्याने पर्यटन खात्याने  सतर्कतेचा इशारा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यासंदर्भात पर्यटन खात्याने निवेदन जारी केले आहे. सतर्कतेचा इशारा न मिळाल्याने यापूर्वी राज्यातील शॅक व्यावसायिकांना ‘ओखी’ चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. या पार्श्‍वभूमीवर पर्यटन खात्याने शॅक व्यावसायिक, जलक्रीडा उपक्रम चालक आणि समुद्राशी निगडीत अन्य व्यावसायिकांना पर्यटन खात्याने दक्षतेचा  इशारा दिलेला आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या  माहितीनुसार, दि.2 जानेवारी आणि 31 जानेवारीला  पौर्णिमा असल्याने   त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ  असेल. ‘सुपरमून’मुळे समुद्राच्या पातळीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शॅक व्यवसाय, जलक्रीडा उपक्रमांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची खबरदारी बाळगावी’ असे, पर्यटन संचालक मेनिनो डिसोजा यांनी कळविले आहे.