होमपेज › Goa › शिवसेनेतर्फे 23 पासून राज्यात जनसंपर्क अभियान 

शिवसेनेतर्फे 23 पासून राज्यात जनसंपर्क अभियान 

Published On: Jan 17 2018 2:12AM | Last Updated: Jan 17 2018 1:47AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोव्यात   शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीने  शिवसेनेतर्फे   23 जानेवारी पासून  जनसंपर्क अभियान सुरू केले जाणार आहे. अभियानासाठी  केंद्रीय उद्योग मंत्री अनंत गीते उपस्थित राहणार आहेत, असे शिवसेना राज्यप्रमुख  शिवप्रसाद जोशी यांनी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले.  जनसंपर्क अभियानाअंतर्गत    शिवसेनेकडून जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे  निरसन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

जोशी म्हणाले, शिवसेनेकडून  गोव्यात 10 हजार सदस्यांची तर 1 हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.  23 जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा  जन्मदिवस असल्याने या दिवशी जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली जाणार असून ते 4 मार्च,  वजयंतीपर्यंत  सुरु राहील. बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या प्राथमिक सरकारी शाळांमध्ये जाऊन तेथील   शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकार पर्यंत पोचवण्यात  येतील.

त्याचप्रमाणे  वृध्दाश्रमात रहात असलेल्या  ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांची भेट  घेतली जाईल व  त्यांना त्यांच्या आईवडिलांना पुन्हा घरी नेण्यास समजावले जाईल. अभियानानंतर  शिवसेनेतर्फे राज्यात अधिवेशनाचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 उत्तर गोवा अध्यक्ष किशोर राव, माधव विर्डीकर, विनोद तळेकर, एकनाथ नाईक, परिमल  पंडित, राजू विर्डीकर व घनश्याम नाईक उपस्थित होते.