Tue, Jul 16, 2019 00:02होमपेज › Goa ›

पार्सेकर, आचार्य यांना समन्स

पार्सेकर, आचार्य यांना समन्स

Published On: Apr 05 2018 2:27AM | Last Updated: Apr 05 2018 2:16AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील 88 खाण लिजांच्या परवान्यांचे नूतनीकरण  बेकायदेशीरपणे केल्याप्रकरणी  लोकायुक्‍तांनी  तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, खाण खात्याचे तत्कालीन सचिव पवनकुमार सेन व खाण खात्याचे संचालक प्रसन्‍ना आचार्य यांना  काल बुधवारी  नोटीस बजावली.  या तिघांनाही 7 मे पर्यंत लेखी उत्तर देण्यासाठी मुदत दिल्याची माहिती लोकायुक्‍त कार्यालयाने दिली. राज्यातील 88 खाण लिजांच्या परवान्यांचे दुसरे नूतनीकरण बेकायदेशीरपणे केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर, खाण खात्याचे तत्कालीन सचिव  सेन व खाण खात्याचे संचालक आचार्य यांच्याविरोधात गोवा फाऊंडेशनचे क्‍लाऊड आल्वारीस यांनी 23 मार्च रोजी  लोकायुक्‍तांकडे तक्रार दाखल केली  होती. खाण लिजांच्या या बेकायदेशीर नूतनीकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी करून  300 पानी तक्रारीसोबत  सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या प्रती जोडण्यात आल्या होत्या.

 खाण कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने   खाण लीज नूतनीकरणाचे  हे पाऊल उचलले. यासाठी सर्वोच्च न्यायालय तसेच एमएमडीआर कायद्याचे  उल्‍लंघन करण्यात आल्याचे आल्वारीस यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.  त्यानुसार लोकायुक्‍तांनी या तक्रारीच्या प्राथमिक चौकशीस सुरुवात केली आहे. आल्वारीस यांची याप्रकरणी  सोमवार  2 एप्रिल रोजी   लोकायुक्‍तांसमोर सुनावणी झाली आहे. आल्वारीस यांनी  लीज नूतनीकरण प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी  आपण  काहीच चुकीचे केले नसल्याचे म्हटले होते. 
 

 

 

 

tags ; Panaji,news,Renewal,88, mining, licenses,state,illegal,Parsekar, Acharya ,Summons,