Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Goa › पर्रीकर पदाचा राजीनामा देणार  ही अफवा : विनय तेंडूलकर

पर्रीकर पदाचा राजीनामा देणार  ही अफवा :  विनय तेंडूलकर

Published On: Feb 25 2018 1:27AM | Last Updated: Feb 25 2018 1:06AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोेहर पर्रीकर हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या सोशल मीडियात पसरत असलेल्या बातम्या या केवळ अफवा आहेत. पर्रीकर मुख्यमंत्री पदाचा  राजीनामा देणार नाहीत,असे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी स्पष्ट केले आहे . तेंडूलकर म्हणाले, पर्रीकर आजारी असल्याने ते आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची सर्वत्र अफवा पसरली आहे. या अफवांमध्ये  कसलेही तथ्य नाही.  या मुद्द्यावर कुठलीही चर्चा झाली नसून   या अफवांवर लोकांनी विश्‍वास ठेवू नये,असेही त्यांनी  सांगितले.

मुंबई येथील रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यानंतर पर्रीकर  यांनी गुरुवारी 22 रोजी गोव्यात येऊन विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. डॉक्टरांनी त्यांनी  सध्या विश्रांती घेण्याचा सल्‍ला दिला असून पर्रीकर यांनी आपल्या निवासस्थानातूनच कामाला सुरुवात केली आहे. पर्रीकर हे सोमवार 26 रोजी पर्वरी येथील सचिवालयात जाऊन  अधिकार्‍यांबरोबर चर्चा करतील तर बुधवारी  28 रोजी मंत्रिमंडळ बैठक घेतील,अशी शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी पणजीच्या मेरी इमॅक्युलेट चर्चमध्ये शनिवारी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.