Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Goa › पणजीत ‘डॉन बॉस्को युथ फेस्टिव्हल’ उत्साहात

पणजीत ‘डॉन बॉस्को युथ फेस्टिव्हल’ उत्साहात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 पणजी : प्रतिनिधी

येथील डॉन बॉस्को  महाविद्यालयाने कॉलेज कॅम्पसवर नुकताच ’डॉन बॉस्को युथ फेस्टिव्हल’ साजरा केला.  डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फातोर्डा, डॉन बॉस्को कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  या तरुणाईच्या उत्सवासाठी त्यांना  कला आणि संस्कृती खात्याचेही सहकार्य लाभले.  
या उत्सवाची संकल्पना ’गोमंतकीय संस्कृती’ अशी होती. त्यात   विद्यार्थ्यांनी, तसेच तिन्ही महाविद्यालयाच्या शिक्षकांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे   उपस्थित होते.  

पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर व प्रोव्हिन्शल रेव्हरंड फा. फेलिक्स फर्नांडिस हे सन्माननीय पाहूणे म्हणून उपस्थित होते. डॉन बॉस्को कॉलेज, पणजी येथील रेव्हरंड फा. विल्फ्रेड फर्नांडिस यांनी    स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात  ढोलताशे वाजवून व आकाशात फुगे सोडून करण्यात आली.  कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले,की   गोव्याच्या संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणले असून ती टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी पुढे येताहेत,याचा आनंद आहे.    या युथ फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक वस्तूंचे प्रदर्शन आयोजण्यात आले होते.

यामध्ये   पारंपरिक फेणी तयार करण्याचे यंत्र, टोपली बनवणे, मातीचे विविध प्रकारचे सामान यांचा समावेश होता.   गोव्यातील पारंपरिक खाद्यपदार्थही बनवण्यात आले होते.   माया मावजो व अनिता गुदिन्हो यांनी  चविष्ट पदार्थ बनवून त्यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोमंतकीय नृत्याचे प्रकार सादर केले. या व्यतिरिक्त ’वॉर ऑफ डीजे’, ’फॅशन शो’ व मिस्टर आणि मिस डॉन बॉस्को आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. ‘फॅसिओन शो’चे विजेतेपद डॉन बॉस्को कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकलचरच्या डेरन याने पटकावलेे. डॉन बॉस्को कॉलेज, पणजीच्या डीएल या विद्यार्थिनीला  ‘मिस डॉन बॉस्को’ म्हणून घोषित केले. 
 


  •