Tue, Jul 23, 2019 19:27होमपेज › Goa › पणजी महापौरपदी उदय मडकईकरांची वर्णी शक्य

पणजी महापौरपदी उदय मडकईकरांची वर्णी शक्य

Published On: Feb 12 2018 2:22AM | Last Updated: Feb 12 2018 2:17AMपणजी : प्रतिनिधी

 पणजी  महानगरपालिकेच्या यंदाच्या महापौर निवडणुकीत विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा पत्ता कट  होणार  आहे. मनपावर वर्चस्व असलेल्या माजी मंत्री अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात यांच्या गटातर्फे नगरसेवक उदय मडकईकर यांची महापौरपदी वर्णी लागणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. दरवर्षी 20 मार्चपूर्वी महापौरपदाची निवडणूक घेतली जाते. ही निवडणूक निर्वाचित नगरसेवकांमध्येच होत असते. मोन्सेरात यांनी मागील अनेक वर्षे महापौरपदावर सुरेंद्र फुर्तादो यांना कायम ठेवले आहे. मात्र, यंदा आपण महापौर बदलणार असल्याचे विधान मोन्सेरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.  यामुळे विद्यमान महापौर फुर्तादो यांच्या जागी कोणाला संधी मिळणार यावर मनपा वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

मनपातील विद्यमान नगरसेवकांमध्ये मडकईकर हे फुर्तादो यांच्यानंतर सर्वात अनुभवी आहेत. मडकईकर हे दुसर्‍यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. याआधी मडकईकर 1997 साली विद्यमान काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्याविरुद्ध मनपा निवडणुकीत अवघ्या चार मतांनी पराजित झाले होते. त्यानंतर, 2006 साली त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवल्यावर मडकईकर यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीत उभे करून तिला विजयी केले होते. मनपाच्या 2016 मध्ये झालेल्या  निवडणुकीत मडकईकर हे प्रभाग क्रमांक 18 मधून 280 मतांनी निवडून  आले आहेत. aमडकईकर मोन्सेरात यांचे  विश्‍वासू मानले जातात, मनपातील राजकारणात अनुभवी व्यक्तीची गरज असल्याने गटातील सर्व नगरसेवकांचा मडकईकर यांना पाठिंबा लाभणार आहे.