Thu, Feb 21, 2019 05:06होमपेज › Goa › ‘जिंदाल’ स्टीलला कोळसा हाताळणी परवाना नाकारला

‘जिंदाल’ स्टीलला परवाना नाकारला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

वास्को येथील जिंदाल स्टील कंपनीच्या मालकीच्या ‘साऊथ वेस्ट पोर्ट लि.’वर कोळसा आणि खनिज वाहतूक हाताळणीस गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत परवानगी नाकारली.
जिंदाल स्टील वर्क्स कंपनीच्या मालकीच्या ‘साऊथ वेस्ट पोर्ट लि.’ने सरकारकडे कोळसा हाताळणीसाठी परवानगी मागितली होती. खाणबंदीमुळे उच्च दर्जाच्या खनिजाची अन्य देशातून आयात करण्याचा इच्छा प्रस्तावही या कंपनीने सरकारकडे दिला होता.

सदर कंपनीकडे पर्यावरण परवाना (ईसी) नसल्याने हे दोन्ही प्रस्ताव मंगळवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत नाकारण्यात आले असून एमपीटीकडून डॉल्फीन धक्का बांधण्यासाठीही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंडळाच्या बैठकीत साळगाव येथील भव्य कचरा प्रकल्पाची कचरा हाताळण्याची क्षमता वाढवण्यास मान्यता देण्यात आली. दक्षिण गोव्यात काकोडा येथे कचरा प्रकल्पासही मंडळाने मंजुरी  दिली. 
 

 

tags ; Panaji ,news,Jindal, Steel, Coal, License,


  •