Wed, Nov 13, 2019 12:17होमपेज › Goa › धारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

धारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 16 2017 12:24AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोवा क्रिकेट  अकादमी (जीसीए)तर्फे धारगळ येथे जागतिक दर्जाचे आणि 50 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले सुसज्ज क्रिकेट स्टेडियम उभारले जाईल, असे आश्‍वासन क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी  गोव्यात सुसज्ज  आणि परिपूर्ण असे क्रिकेट स्टेडियम सरकारने उभारावे, अशी मागणी करणारा खासगी ठराव मांडला. पाटणेकरांच्या ठरावाला सभागृहातील दोन्ही बाजूच्या आमदारांनी पाठिंबा दिला. 

आजगावकर यांनी  सांगितले की, धारगळ येथील सुमारे दोन लाख चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड भाडे तत्त्वावर ‘जीसीए’ला देण्याचे सरकारने तत्त्वत: मान्य केले आहे. सदर प्रस्तावाला मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मान्यता दिली. देशात कुठेही क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेट संघटनेला सुमारे 100 कोटींची मदत दिली जाते.  या योजनेचा लाभ सरकारनेही घ्यावा, असे पाटणेकर यांनी सांगितले. या आश्‍वासनानंतर पाटणेकर यांनी ठराव मागे घेतला.