Sun, Jul 21, 2019 12:36होमपेज › Goa › ‘इफ्फी’त प्रादेशिक सिनेमाला  अधिक संधी द्यावी

‘इफ्फी’त प्रादेशिक सिनेमाला  अधिक संधी द्यावी

Published On: Jan 06 2018 1:21AM | Last Updated: Jan 05 2018 10:53PM

बुकमार्क करा
पणजी ः प्रतिनिधी

प्रादेशिक सिनेमाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी)  प्रतिनिधित्वासाठी  अधिक संधी दिली पाहिजे, अशी सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृति इराणी यांनी केली.   इफ्फी 2017 चा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दिल्ली येथे सल्लागार समितीच्या बैठकीत  त्यांनी मार्गदर्शन केले,असे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे  आयोजन करण्यासाठी केलेले प्रयत्न आणी पुढीलवेळच्या आयोजनात सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासंदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. बैठकीस खासदार  मनोज कुमार तिवारी, विवेक गुप्ता, मुनमून सेन वर्मा, डॉ संजय जयस्वाल, माहिती व प्रसारण सचिव एन. के. सिन्हा व मंत्रालयातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 इफ्फी 2017 आयोजनासाठी खात्याच्या अधिकार्‍यांनी व रसहकार्‍यांनी घेतलेली मेहनत आणि उपक्रमांचे इराणी यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे भविष्यात सर्व समित्यांची पुनर्रचना करण्यात  येईल व  सुकाणू समिती आणि आढावा समितीचा  विस्तार केला जाईल,असेही त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच इफ्फीने टोरंटॉ आणि व्हेनिस  चित्रपट महोत्सवांशी अधिकृतपणे सहयोग केला. इफ्फी 2017 मध्ये, 9 मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले, 197 चित्रपटांचे स्क्रीनिंग केले गेले आणि 4 9 3  प्रतिनिधींना आमंत्रित केले होते  असे  इराणी यांनी सांगितले.