Sat, Jul 20, 2019 22:04होमपेज › Goa › राज्यात बेशिस्त पर्यटकांची गय नाही 

राज्यात बेशिस्त पर्यटकांची गय नाही 

Published On: Feb 10 2018 1:30AM | Last Updated: Feb 10 2018 12:29AMपणजी : प्रतिनिधी

बेशिस्त वर्तन करून   गोव्याचे नाव खराब करणार्‍या पर्यटकांची गय केली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्‍या उद्दाम पर्यटकांना राज्यात थारा दिला जाणार नसल्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले. येथील दयानंद बांदोडकर मैदानावर गोवा अन्न आणि सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवारी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पणजी- मिरामार येथे भररस्यावर उभ्या असलेल्या बसमधून लघुशंका करणार्‍या एका पर्यटकाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर बेशिस्त वागणार्‍या पर्यटकांवर पर्यटनमंत्री म्हणून आपण काय कारवाई करणार, असा प्रश्‍न पत्रकारांनी केल्यावर आजगावकर यांनी वरील उत्तर  दिले.

 यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष  निलेश काब्राल, पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो , पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होतेे. गोवा अन्न आणि सांस्कृतिक महोत्सव शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. गोव्याच्या पारंपारिक खाद्य व  डिशेस पुरवणारे अनेक स्टॉल्स, हस्तकला वस्तू   विक्री करणार्‍या स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय,  लोकप्रिय राष्ट्रीय बँड्सचा कलाविष्कार असेल, यात अग्नी लागोरी, रवी चारी, जिनो बँक्स अँड ट्रूप यांचा समावेश असेल. याबरोबरच गोव्याच्या सर्वोत्तम बँड्स ‘क्रिमसन टाइड ’ आणि ‘रागाज टू रिचेस’सह राहुल यांचे लाइव्ह म्युझिक, आंतरराष्ट्रीय कलाकारांचा नृत्याविष्कार, अनुषा शेख यांचा फॅ शन शो, वाळूमधील शिल्पकला कार्यशाळा आणि शेफ दे गोवा कुकिंग कॉण्टेस्ट अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.