Wed, Jul 24, 2019 05:41होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांचा निवासातून प्रशासकीय कारभार

मुख्यमंत्र्यांचा निवासातून प्रशासकीय कारभार

Published On: Mar 03 2018 1:50AM | Last Updated: Mar 03 2018 12:03AM पणजी : प्रतिानिधी

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ)   5 दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज घेतलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी   शुक्रवारपासून आपल्या दोनापावला येथील निवासस्थानातून कामकाज सुरू केले. ते येत्या सोमवारी त्यांच्या पर्वरीतील सरकारी कार्यालयात जाणार असून पुढील आठवड्यात पुन्हा मुंबईला वैद्यकीय उपचारासाठी जाण्याची शक्यता असल्याचे निकटच्या सूत्रांनी सांगितले.       

‘गोमेकॉ’त उपचारार्थ भरती झालेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचारांसाठी त्यांना पुढच्या आठवड्यात बुधवारी वा गुरुवारी मुंबईला नेले जाऊ शकते, असे सांगण्यात आले. दरम्यान, आपण सोमवारी पर्वरीतील मंत्रालयात पूर्ण क्षमतेने कामकाज करणार असल्याचे पर्रीकर यांनी काही निकटवर्तीयांना   सांगितल्याचे कळते.  दोनापावला येथील निवासस्थानी पर्रीकर यांची     

आरोग्याच्यादृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. पर्रीकर यांना बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटू दिले जात नाही. त्यांना गुरूवार संध्याकाळपासूनच मंत्रालयातून फाईलींचा ढीग पाठवण्यात आला असून त्यातील महत्वाच्या फाईल पर्रीकर यांनी शुक्रवारपासून हातावेगळ्या करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी फाईलींवरील धूळ व संसर्गाचा त्रास होऊ नये म्हणून या फाईली ‘सेनिटायज’ही (निर्जंतूक) केल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.