Tue, May 21, 2019 05:02होमपेज › Goa › आजपासून  कार्निव्हलची धूम

आजपासून  कार्निव्हलची धूम

Published On: Feb 10 2018 1:30AM | Last Updated: Feb 10 2018 12:46AMपणजी : प्रतिनिधी

‘खा.. प्या.. मजा करा’, असा संदेश देत आज,  शनिवारपासून  राज्यात चार दिवस किंग मोमोची  राजवट  सुरू होणार आहे. ब्रुनो आझारवेदो यांची  यंदाच्या कार्निव्हलसाठी किंग मोमो म्हणून  निवड करण्यात आली आहे.  यंदा पणजी येथे होणार्‍या कार्निव्हल मिरवणुकीसाठीचा मार्ग बदलण्यात आला आहे. जुन्या सचिवालयाऐवजी  मिरवणुका मीरामार, दोनापावला या मार्गावर होणार आहेत. दुपारी 4 वाजल्यापासून कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

कार्निव्हलचे आयोजन करणार्‍या ब्राझील या देशानंतर गोवा हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे गोव्यातील कार्निव्हल पाहण्यासाठी दरवर्षी  देशी-विदेशी पर्यटक उपस्थिती लावतात. कार्निव्हलनिमित पणजी शहरात ठिकठिकाणी मुखवटे, रंगबिरंगी कमानी उभारून सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात सध्या कार्निव्हल फिवर चढला आहे.  
राज्यात 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान कार्निव्हल होणार असून त्याची सुरुवात शनिवारी पणजीत   होईल. मिरवणुकीनिमित्त चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दि. 11 रोजी  मडगाव  व फोंडा, दि. 12 रोजी वास्को व कुडचडे  तर दि. 13 रोजी म्हापसा व मोरजी येथे या कार्निव्हल मिरवणुका होतील.