Thu, Jul 18, 2019 06:30होमपेज › Goa › मानवाधिकार आयोगाकडे ‘आझाद जमातुल’ची याचिका 

मानवाधिकार आयोगाकडे ‘आझाद जमातुल’ची याचिका 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सरकार एका बाजूने सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत असतानाच राज्यातील 12 तालुक्यांमधील गावांमध्ये हिंदू स्मशानभूमी, ख्रिश्‍चनांसाठीची  दफनभूमी तसेच मुस्लिम  कब्रस्तानांचा अभाव आहे. या गोष्टीची दखल घ्यावी अशी मागणी करुन आझाद जमातुल मुस्लिम वेल्फर ट्रस्टने मानवाधिकार आयोगाकडे  याचिका दाखल केली  आहे. 

गोव्याला मुक्‍ती मिळून 56 वर्ष पुर्ण झाली असून अनेक सरकार येऊन गेली. मात्र आजही राज्यातील विविध गावांमध्ये    हिंदू स्मशानभूमी, ख्रिश्‍चनांसाठीची  दफनभूमी तसेच मुस्मिल  कब्रस्तान नसून   यासाठी आवश्यक  त्या जमिनींचा अभाव दिसून  येत असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

गोव्यात 12 तालुक्यांमध्ये   191 पंचायतीं तसेच    426 गावे आहेत.  या   गावांपैकी 43 गावांमध्ये  हिंदू स्मशानभूमी,50 गावांमध्ये   ख्रिश्‍चन   दफनभूमी तर  174 गावांमध्ये   मुस्मिल  कब्रस्तानच नाहीत,असे याचिकेत नमूद केले आहे.

2011 च्या जनगणने नुसार  राज्यात  66.08 टक्के म्हणजे 9 लाख 63 हजार 877 हिंदू, 25.10 टक्के म्हणजे 3 लाख 66 हजार 130 ख्रिश्‍चन,8.33 टक्के   म्हणजे 1 लाख 21 हजार 564 मुस्लिम व 0.49 टक्के   म्हणजे 6 हजार 974 अन्य धर्मिय आहेत,असेही याचिकेत नमूद केले आहे. राज्यात मनोरंजनात्मक कार्यक्रम,  सास्कृतिक कार्यक्रम, इफ्फी, उद्याने, प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.

पर्यटनाच्या नावाखाली   विविध प्रकल्प उभारण्यासाठी   सरकारकडून   लाखो  चौरस मीटर जागा दिल्या जातात. मात्र,  सर्व धर्मांच्या लोकांसाठी अत्यसंस्कारासाठी  आवश्यक असलेली जागा उपलब्ध करण्याबाबत सरकारचे दुर्लक्ष होत आहे. हिंदू स्मशानभूमी, ख्रिश्‍चन दफनभूमी तसेच मुस्लिम  कब्रस्तानचा अभाव म्हणजे घटनेचे तसेच  मानवाधिकाराचे उल्‍लंघन ठरते.    या गोष्टीची  सरकारने गंभीर दखल घ्यावी, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
 


  •