Thu, Feb 21, 2019 00:58होमपेज › Goa › पणजीत ८ एप्रिल ला अखिल गोवा मराठी साहित्य संमेलन

पणजीत ८ एप्रिल ला अखिल गोवा मराठी साहित्य संमेलन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

ताळगाव येथील माधव राघव प्रकाशन आणि साहित्य लेणी प्रतिष्ठानतर्फे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेच्या सहक ार्याने यावर्षी तिसरे अखिल गोवा मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 8 एप्रिल रोजी इन्स्टिट्यूट मिनेझिसच्या मिनी सभागृहात हे एक दिवसीय साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी  प्रख्यात विनोदी साहित्यिक  विजय कापडी यांची निवड झाली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून साखळी येथील  सुलक्षणा प्र. सावंत यांची निवड झाली आहे. 

साहित्यिका लीना पेडणेकर  यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  पत्रकार सागर जावडेकर, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.

प्राचार्य रामदास केळकर यांचा तसेच माजी स्वागताध्यक्ष धर्मा चोडणकर यांचा सत्कार क रण्यात येईल. या संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखत, युवकांचे अनुभव विश्‍व जाणून घेण्याविषयी सुसंवाद असा कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

 

Tags : Panaji, Panaji news, Akhil Goa Marathi Sahitya Sammelan,


  •