Sun, Apr 21, 2019 01:58होमपेज › Goa › मडकईकरांच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाईचे आदेश

मडकईकरांच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाईचे आदेश

Published On: Apr 26 2018 2:14AM | Last Updated: Apr 26 2018 2:08AMपणजी : प्रतिनिधी

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या जुनेगोवे येथील कथित  अनधिकृत बंगल्यावर  कारवाई   करावी, असे   निर्देश     पंचायत      खात्याच्या  उपसंचालकांनी   तिसवाडी गट विकास अधिकार्‍याला (बीडीओ) दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबाबतचा  अहवाल  चार आठवड्यात सादर करावा. गोवा पंचायत  राज कायद्यातील  तरतुदीनुसार ही  कारवाई करावी, असेही सांगण्यात आले आहे.

 वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या कथित  अनधिकृत बंगल्याप्रकरणी  माहिती हक्क कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी  16 एप्रिल रोजी मुख्य सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तसेच पंचायत  संचालकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.   सदर बंगला  मडकईकर यांच्याच निकिताशा रियल्टर्स प्रा. लि. या कंपनीकडून उभारण्यात आला असून  यासाठी  नियमांचे  उल्लंघन करण्यात आले असल्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

tags : goa, unauthorized bungalows, Madkikekar

 अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी या बंगल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसस्थानक तसेच  9 एप्रिल रोजी  भारतीय पुरातत्त्व विभागाकडे देखील तक्रार सादर केली होती. पोलिसांकडे त्यांनी  सदर बेकायदेशीर बंगल्याप्रकरणी मडकईकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणीही केली आहे.