Tue, Aug 20, 2019 04:51होमपेज › Goa › करासवाडा-अस्नोडा रस्ता रुंदीकरणाला विरोध

करासवाडा-अस्नोडा रस्ता रुंदीकरणाला विरोध

Published On: Aug 21 2018 1:35AM | Last Updated: Aug 20 2018 11:50PMथिवी : वार्ताहर

करासवाडा ते अस्नोडा पयर्ंतच्या  रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या   सरकारच्या प्रस्तावास विरोधाचा ठराव रविवारी थिवीच्या सरपंच शर्मिला गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत  सर्वानुमते संमत करण्यात आला.

करासवाडा ते अस्नोडा रस्ता रूंदीकरण झाल्यास रस्त्यालगतची राहती घरे, क्रीडामैदाने रस्त्या लगतच्या शाळा, देवळे , चर्च आदी पाडले जातील. रस्ता रुंदीकरणामुळे गाव विभागला जाईल. रस्ता आहे तसाच ठेवावा,  असे नमूद करून रस्ता रूंदीकरणास विरोध करणारा ग्रामस्थांनी मांडलेला ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.

थिवी आंब्यानी  येथे नवीन गृहनिर्माण वसाहतीसाठी प्रयत्न  सुरू असून अशी वसाहत उभी  राहल्यास थिवीवासीयांना पाणी , वीज व इतर सुविधांची समस्या  उद्भवेल.गृहनिर्माण वसाहतीत परप्रांतीयच लोक जागा खरेदी करतील ,कारण त्या जमिनीचा भाव गोवेकरांना परवडणारा नसेल. तेव्हा आंब्यांनी गृहनिर्माण वसाहतही नको,असा ठरावही सर्वानुमते संमत करण्यात आला. मागील सभेचे अहवालवाचन करून त्यास  सचिव धीरज गोेेवेकर  यांनी मान्यता घेतली. ग्रामस्थ रॉबर्ट कुलासो यांनी लेखी स्वरूपात मांडलेल्या तीन  प्रश्‍नांवर चर्चा झाली.

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा हॉटेल प्रकल्प अस्नोडा मयते येथे  प्रस्तावित असून सदर हॉटेल उभे राहिल्यास  हॉटेलचे दुषित सांडपाणी सोडल्यावर ते अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात जाऊन ते पाणी प्यायल्याने रोगराई पसरेल. तेव्हा हाही प्रकल्प थिवीवासीयांना नको,असा ठराव आवाजी मतदानाने  संमत करण्यात आला.

गावात विविध ठिकाणी पाच अंगणवाड्या  चालतात पण त्यांना व्यवस्थित जागा नाही. गावात किती तरी  सरकारी शाळा आहेत व पटसंख्ये  अभावी काही  वर्ग बंद असून  असे बंद वर्ग अंगणवाडीसाठी  देण्याचे   ग्रामस्थांनी  सुचविले.  शिक्षण खात्याशी चर्चा    करून त्यावर तोडगा काढू,असे आश्‍वासन उपसरपंच शिवदास कांबळी यांनी दिले.

गावात सेट अ‍ॅन शाळेजवळ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी काही युवक  मद्यपान करून दारूच्या बाटल्या टाकून देतात. त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच रात्रीची वीजही अचानक गायब होते, त्यावरही तोडगा काढावा, असे ग्रामस्थांनी सुचविले.

ग्रामसभेला सरपंच शर्मिला गडेकर, उपसरपंच शिवदास कांबळी, समिक्षा मयेकर, सुनिता साळगांवकर, लिओ परेरा, अंकुश सातार्डेकर, विठ्ठल वायंगणकर, संदीप कवठणकर, उपस्थित होते.  मायकल फनार्ंडिस  व अर्जून आरोसकर गैरहजर होते. गट विकास कार्यालयातर्फे आवेलिनो डिसोझा उपस्थित होते.  उपसरपंच शिवदास कांबळी यांनी  आभार मानले.