Tue, Nov 20, 2018 19:02होमपेज › Goa › जनसुनावणी न घेतल्यास ‘पीडीए’ला विरोध   

जनसुनावणी न घेतल्यास ‘पीडीए’ला विरोध   

Published On: Dec 02 2017 12:25AM | Last Updated: Dec 02 2017 12:01AM

बुकमार्क करा

पेडणे : प्रतिनिधी

पेडण्यात  पीडीए स्थापन करण्यापूर्वी  सरकारने जनसुनावणी घेऊन त्याचे फायदे-तोटे पेडणेकरांना  सांगावेत, अन्यथा या प्रस्तावित पीडीएला विरोध करण्यात येईल, असा इशारा पेडणे गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष    उमेश तळावणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मोपा येथे  पीडीए होणार ,असे विधान नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केले. ही पीडीए कशासाठी यातून कोणता लाभ स्थानिकांना होणार तसेच पीडीए लादल्यानंतर कोणत्या समस्या उद्भवणार, याचा सरकारने खुलासा करणे गरजेचे असून यासाठी पेडण्यात जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी तळावणेकर यांनी केली. 

मोपा  विमानतळ परिसरातील 5 कि.मी. क्षेत्रात येणार्‍या पंचायतीवर प्रस्तावित पीडीएचा परिणाम होणार असून गोरगरीब जनतेला मोपा पंचायत क्षेत्रात पीडीएची गरज नाही,  असे सांगून  पीडीए लादल्यास मोपा पंचायतीला कोणते अधिकार राहणार तेही सरकारने सांगावे,असेही तळावणेकर म्हणाले. 

उत्तर गोवा सरचिटणिस सुभाष केरकर  म्हणाले की,या पीडीए समितीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई व पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे तिघेजण आहेत. यापूर्वी विजय सरदेसाई यांचा मोपा विमानतळ प्रकल्पाला कडाडून विरोध होता. आता मात्र ते मोपा येथे होणार्‍या विमानतळाचे समर्थन करतात. 

पीडीए साठी ते प्रयत्न करत असून सध्या गोव्यात नद्यांचे राष्ट्रीयीकरण, कोळसा हबला विरोध होत असताना पीडीएचे भूत पेडणेसारख्या ग्रामीण भागात स्थानिक आमदार व सरकार का लादत आहे, असा प्रश्‍न केरकर यांनी उपस्थित केला.  अ‍ॅड.  मुरारी परब,   दशरथ महाले यांनीही आपले विचार मांडले.