Wed, Apr 24, 2019 11:53होमपेज › Goa › स्पीड गव्हर्नरला विरोध; सर्वोच्च न्यायालयाला कळवा

स्पीड गव्हर्नरला विरोध; सर्वोच्च न्यायालयाला कळवा

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 23 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

स्पीड गर्व्हनरला राज्यातील  टुरिस्ट टॅक्सी मालकांचा विरोध असून  तसे सर्वोच्च न्यायालयाला कळवण्यात यावे, असे निवेदन अखिल गोवा टुरिस्ट टॅक्सी मालकांनी उपसभापती मायकल लोबो यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सोमवारी सादर केले. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी  टॅक्सींना फिटनेस प्रमाणपत्र जारी करण्यासंदर्भातील फाईल वाहतूक सचिवांना पाठवली आहे, असे  उपसभापती मायकल लोबो यांंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्पीड गव्हर्नर व डिजिटल मीटरविरोधात राज्यातील सुमारे 17 हजार टुरिस्ट टॅक्सी मालकांनी तीन दिवस संप पुकारला होता.