Wed, Mar 20, 2019 08:51होमपेज › Goa › कोळसा हाताळणीची क्षमता  वाढविण्याला विरोध : पर्रीकर

कोळसा हाताळणीची क्षमता  वाढविण्याला विरोध : पर्रीकर

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:39PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

वास्को येथील मुरगाव पतन न्यास (एमपीटी) बंदरात कोळसा हाताळणीची  क्षमता वाढवण्याला राज्य सरकारचा विरोध असून कोळसा हाताळणीचे  विस्तारीकरण करू दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

एमपीटीमध्ये खासगी कंपन्यांना कोळसा हाताळणी क्षमता वाढवून दिल्याचा आरोप विरोधी काँग्रेस व अन्य स्वयंसेवी संघटनांनी करून आंदोलन केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर म्हणाले, की एमपीटी बंदरात सध्या बर्थचे विस्तारीकरण  होत असून त्याचा संबंध कोळसा हातळणीशी नाही. राज्य सरकारचे कोळसा हातळणीसंबंधीचे धोरण कायम असून ते बदलणार नाही. या बर्थचा वापर स्टील, लाकडी भूसा आदींच्या हाताळणीसाठी  केला तर त्याला सरकारचा विरोध असणार नाही. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी कोळसा हातळणीसंबंधी सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना पर्रीकर म्हणाले, की नाईक  यांचे वय झाल्याने त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. राज्याच्या आर्थिक अहवालाबाबतही नाईक जुनी माहिती देत आहेत. सध्या राज्याची 943 कोटींची वित्तीय तूट असून ते मर्यादेच्या आत आहे.