होमपेज › Goa › काँग्रेस आमदार-‘एनजीओ’कडून विरोध

काँग्रेस आमदार-‘एनजीओ’कडून विरोध

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 12:37AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोधी आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी करून आणि अनेक स्वयंसेवी संघटनांनी सभागृहाबाहेर निदर्शने करून विरोध दर्शवला. काँग्रेस आमदार रवी नाईक यांनी नद्यांच्या विकासाबाबत केंद्राशी करार हवाच कशाला, असा सवाल उपस्थित केला. राज्यातील महामार्गांच्या बांधकामांसाठी जर केंद्र सरकार निधी देऊन विकासकामे करू शकते, तर हीच गोष्ट नद्यांबाबत का शक्य नाही, अशीही विचारणा त्यांनी केली. 

भारत मुक्‍ती मोर्चाच्या नेत्या मॅगी सिल्वेरा यांनी सादरीकरणात बंदर कप्तानांनी लोकांच्या प्रश्‍नांचे समाधान करण्याची गरज असल्याचे मत व्यक्‍त करून मुख्यमंत्री खुलासा का करत आहेत, अशी विचारणा केली. मिनेझीस ब्रागांझा सभागृहाबाहेर ‘गोवा अगेन्स्ट  कोल’, ‘भारत मुक्‍ती मोर्चा’ आणि अन्य एनजीओ संघटनेच्या प्रतिनिधींनी सरकारच्या विरोधात फलक घेऊन घोषणाबाजी  केली.