Sat, Nov 17, 2018 22:50होमपेज › Goa › हा तर विरोधकांचा ‘पब्लिसिटी स्टंट’

हा तर विरोधकांचा ‘पब्लिसिटी स्टंट’

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 21 2018 1:31AMपणजी : प्रतिनिधी

फार्मेलिनचा विषय उपस्थित करून सभागृहात गोंधळ घालणे म्हणजे   विरोधकांचा ‘पब्लिसिटी स्टंट’  असल्याची टीका मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.फार्मेलिनच्या पार्श्‍वभूमीवर  मासळीच्या आयातीवर सरकारने  बंदी घातली आहे. मासळीचे सात ट्रकदेखील सरकारकडून परत पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.पर्रीकर म्हणाले, फार्मेलिनवर  आपण सोमवारी (दि. 23) सभागृहात उत्तर देणार आहे.

विरोधकांनी  कामकाज स्थगितीचा प्रस्ताव मांडला नव्हता. मात्र, तरीदेखील विरोधकांकडून फार्मेलिनच्या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी करुन गोंधळ घालण्यात आला. फामेर्र्लिनयुक्‍त मासळीच्या विषयावर सरकारकडून आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.मासळीचे जे ट्रक परत पाठवण्यात आले, त्यातील मासळीच्या दर्जाचा प्रश्‍न नाही. परराज्यातील मासळी राज्यात येणे हा  विषय आहे.  प्रश्‍नोत्तर तासानंतर फार्मेलिनयुक्‍त मासळीवर चर्चा करण्याची संधी दिली जाईल,असे सभापतींनी विरोधकांना सांगितले होते.  मात्र, त्यांनी काहीच न ऐकता गोंधळ सुरुच ठेवला. त्यांचा हा गोंधळ केवळ प्रसिध्दीसाठीचा स्टंट असल्याचेही पर्रीकर म्हणाले.