Mon, Jun 24, 2019 17:42होमपेज › Goa › प्रात्यक्षिकानंतरच ‘ब्लॅक होल’ला परवानगी द्या

प्रात्यक्षिकानंतरच ‘ब्लॅक होल’ला परवानगी द्या

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:33AMमडगाव : प्रतिनिधी

‘ब्लॅक होल’ कंपनीला केवळ सादरीकरणाच्या आधारावर परवानगी न देता सोनसड्यावरील कचर्‍यावर ते कोणत्या प्रकारे प्रक्रिया करतात ते पाहूनच मंजूरी द्यावी, अशी मागणी मडगाव नगरपालिका मंडळाने बोलावलेल्या खास बैठकीत नागरसेवकांनी केली. 

दरम्यान, ग्रीन फोमेंतो, हायक्युप व इतर अनेक कंपन्यांनी कचरा विल्हेवाटीसंदर्भात सादरीकरण केले.  परंतु, सोनसड्यावरील कचर्‍यावर प्रक्रिया करणे कोणालाच शक्य झाले नाही. भाजपचे नगरसेवक रुपेश महात्मे म्हणाले की, यापूर्वी अनेक कंपन्यांनी कचरा विल्हेवाटीसंदर्भात सादरीकरण केले. पण प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. उलट प्रत्येक महिन्याला पालिकेला कोट्यवधी रुपयांची बिले येत राहिली. नगरसेवकांनी बेंगळुरू येथे जाऊन ब्लॅक होल चे तंत्रज्ञान पाहिले असले तरी यावेळी सोनसड्याचा कचरा तिथे नेऊन त्यावर प्रक्रिया करून पाहावी आणि नंतरच निर्णय घ्यावा, अशी सूचना महात्मे यांनी केली. काँग्रेसच्या नगरसेवक डोरिस टेक्सेरा यांनीही त्याच्या मागणीला समर्थन दिले.

नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई यांनी सांगितले की, काही नगरसेवक ब्लॅक होल कंपनीचे तंत्रज्ञान पाहण्यासाठी बंगळुरू येथे गेले होते. पण सोनसड्यावर साठवलेला कचरा बेंगळुरू येथील कचर्‍यापेक्षा फार वेगळा आहे. येथील कचर्‍यात बांधकामाचे साहित्य, काचा, प्लास्टिक आदींचा समवेश आहे. त्यामुळे या कचर्‍यावर थेट प्रक्रिया होऊ शकेल की नाही यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. काही नगरसेवकांना ते तंत्रज्ञान पाहायचे आहे. सोनसड्यातील कचर्‍याचा साठा वेगळ्या स्वरूपाचा आहे.त्यामुळे ब्लॅक होल कंपनीच्या तंत्रज्ज्ञाना बोलावून त्यांच्याकडून पावरपॉईंट प्रेझेन्टेशन करवून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, अशी माहिती आंगले यांनी दिली. जोपर्यंत पावरपॉईंट सादरीकरण होत नाही, तसेच  ब्लॅक होल कंपनी मडगावातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात यशस्वी होत नाही, तोवर सदर कंपनीला ना हरकर दाखला देऊ नये, अशी मागणी नगरसेवकांनी केल्याचे आंगले यांनी सांगीतले.या सदरीकरणावेळी नगरसेवक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, मडगावातील प्रतिष्ठित लोक आणि सरकारी अधिकारी यांना बोलावले जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मडगावातील कचरा प्रक्रिया प्रश्‍न सुटलेला नाही.

त्यामुळे सर्वांना यावर ठोस उपाययोजना झालेली हवी आहे. प्रक्रिये दरम्यान निर्माण होणारी भुकटी किंवा राखेचा पुढील वापर कसा केला जाईल, यावर माहिती देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. या कचर्‍यात प्लास्टिक सापडल्यास त्यावर वेगळी प्रक्रिया केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आमच्या कचर्‍यात साठ टक्के माती आणि काँक्रिंट सापडते शिवाय टायर्स सुद्धा असतात. त्यामुळे या सर्व कचर्‍यावर योग्य प्रक्रिया केली जाणार आहे. सादरीकरणावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनाही निमंत्रित केले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष आंगले यांनी दिली.पावरपॉईंट प्रेझेन्टेशन आणि नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आंगले म्हणाल्या. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेने सोनसड्यात चिखल टाकणे बंद केले आहे. हा चिखल सखल भागासाठी वापरला जात आहे.