Thu, Jun 20, 2019 21:07होमपेज › Goa › वेश्याव्यवसाय प्रकरणी पणजीत एकास अटक

वेश्याव्यवसाय प्रकरणी पणजीत एकास अटक

Published On: Sep 02 2018 1:11AM | Last Updated: Sep 01 2018 11:59PMपणजी : प्रतिनिधी

पराराज्यातून मुलींना वेश्या व्यवसायासाठी गोव्यात आणून ग्राहकांना पुरवित असल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करून पिंटू साह (वय 34, बिहार) याला अटक केली. पीडित युवतीला मेरशी येथील महिला सुधारगृहात पाठवले आहे. पिंटू याला पोलिस कोठडीत पाठवले असून  त्याची कसून चौकशी केली जात आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील 18 जून मार्गावरील एका हॉटेल नजीक संध्याकाळी 7.50 ते रात्री 9.50 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पिंटू हा एका ग्राहकाला   वेश्याव्यवसायासाठी मुलीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पिंटू याला अटक केली. तो मोबाईलवरून  ग्राहकांशी संपर्क साधून ठरावीक रक्‍कमेसाठी व्यवहार करायचा. पणजी पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.