Sat, Jul 20, 2019 15:28होमपेज › Goa › फोंड्यात गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक 

फोंड्यात गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक 

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMफोंडा : प्रतिनिधी

कपिलेश्‍वरी फोंडा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या रमजान अल्लाबक्ष शेख (29, मुस्लिमवाडा बाणास्तारी) या संशयिताला फोंडा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 2 किलो, 120 ग्राम गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे 3 लाख 25 हजार रुपये आहे. गेल्या दीड महिन्यात फोंडा पोलिसांनी गांजाविषयी केलेली ही नववी कारवाई आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलेश्‍वरी येथे शनिवारी संध्याकाळी संशयित गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा रचला असता संध्याकाळी 6.20 वाजता संशयित त्याठिकाणी आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. गेल्या दीड महिन्यात केलेल्या कारवाई पेक्षा यावेळी मोठ्याप्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये, हवालदार जितेंद्र गावडे, समीर पाटील, उदय बोरकर,  पोलिस शिपाई सुरज गावडे , केदार जल्मी व नितीन रायकर यांनी ही कारवाई केली.