होमपेज › Goa › मच्छीमारांनी खोल समुद्रात उतरू नये

मच्छीमारांनी खोल समुद्रात उतरू नये

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:33AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

अरबी समुद्रात आग्नेय दिशेला घोंगावणार्‍या ‘ओखी’ चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे मच्छीमारांना गोवा व महाराष्ट्रातील किनारपट्टी व खोल समुद्रात न उतरण्याचा इशारा गोवा वेधशाळेचे संचालक एम. एल. साहू यांनी शनिवारी दिला. 

साहू म्हणाले, गोव्यावर या वादळाचा काही परिणाम होणार नाही. मात्र, मच्छीमारांनी सावधगिरी बाळगण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये या वादळाने हाहाकार माजवला असून या पार्श्‍वभूमीवर पुढील 48 तासांत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. खोल समुद्रात असलेल्या मच्छीमारांनी  शक्य तितक्या लवकर किनार्‍यावर परतण्याची सूचनाही वेधशाळेने केली आहे.  शनिवारी (दि.2) दुपारी 3.30 नंतर पणजीसह राज्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुुळे काहीसा उकाडा जाणवत होता. सोमवारी ‘ओखी’ हे चक्रीवादळ गोव्यातील समुद्रकिनारपट्टीपासून दूरवरून जाण्याची शक्यता असल्याने सोमवारी (दि.4) राज्यात ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यताही वेधशाळेने व्यक्त केली आहे.