Sun, Feb 23, 2020 15:20होमपेज › Goa › अश्‍लिल हावभाव; चार महिलांना अटक

अश्‍लिल हावभाव; चार महिलांना अटक

Published On: Aug 25 2019 1:16AM | Last Updated: Aug 25 2019 1:16AM
म्हापसा : प्रतिनिधी

येथील बसस्थानक परिसरात उभे राहून अश्‍लिल हावभाव करून ग्राहकांना खुणावणार्‍या चार महिलांना म्हापसा पोलिसांनी शनिवारी अटक केली. पोलिस निरीक्षक कपील नायक यांनी ही कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी अश्‍लिल हावभाव केल्याप्रकरणी अनैतिक व्यवहार कायद्याच्या कलम नं. 8 अन्वये म्हापसा पोलिसांनी संशयित महिलांना अटक केली. या महिला म्हापशातील महत्वाच्या जंक्शनवर उभ्या राहून वेश्या व्यवसाय करीत असतात.