Thu, Jul 18, 2019 01:00होमपेज › Goa › मडगावात ‘नर्सरी’च्या परवान्यासाठी व्यापार्‍यांची धावाधाव

मडगावात ‘नर्सरी’च्या परवान्यासाठी व्यापार्‍यांची धावाधाव

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:45PMमडगाव : प्रतिनिधी 

मडगावात व्यापार परवान्याशिवाय गेल्या 15  वर्षांपासून विविध ठिकाणी फ्रुट अ‍ॅण्ड प्लांट नर्सरी चालत आहे. हा बेकायदेशीर व्यापार शहराच्या प्रवेशद्वारापासूनचसुरू होतो. या व्यापाराच्या माध्यमातून आकर्षक केमिकल युक्त फुल झाडांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत आहे. कायद्यानुसार हा दंडात्मक गुन्हा असल्याने या बेकायदेशीर व्यापारावर कडक कारवाई करावी,  अशी मागणी बिगर सरकारी संघटना आणि  शहरवासीयांनी केली होती. याबाबत दैनिक ‘पुढारी’मध्ये  प्रसिद्ध झालेल्या सिटी फ ोकस  वृत्ताची दखल घेत सोमवारी मडगावच्या विभागीय कृषी कार्यालयात काही व्यापार्‍यांनी धाव घेतली. तसेच दोन दिवसांत परवाना प्रक्रीया पूर्ण करणार असल्याचे कृषी अधिकार्‍यांना सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मडगाव, नावेली, फातोर्डा, नुवे आदी ठिकाणी मुख्य मार्गवर फ्रुट अ‍ॅण्ड प्लांट नर्सरी आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच तब्बल पाच नर्सरी असून या पाचही बेकायदेशीर आहेत. या पाचही नर्सरीने शहराच्या महामार्गाकडील सुमारे 680 चौरस मीटर जागा व्यापली आहे. हा व्यापार मोठ्याप्रमाणात वाढलेला आहे. 

प्रत्येक नर्सरी जवळपास  100 ते 150 चौरस मीटर जागेत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलझाडे उपलब्ध आहे. त्यामुळे याकडे ग्राहक आकर्षित होत असतात. 50, 100, 150  200 तर काही खास फुलझाडांच्या रोपट्यांची किंमत 500 ते हजार रुपयांपर्यंतही आहे. द गोवा फ्रुट अँड प्लांट नर्सरीज कायदा 1995 च्या नुसार राज्य सरकारने गेल्या महिन्यात व्यापार परवाना लवकरच प्राप्त करावा, यासाठी  नोटीसा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, याला अल्प प्रतिसाद लाभला. राज्यत 1998 सलात एकूण 140 नर्सरीनी व्यापार परवाना घेतला होते. तो पुन्हा 2003 सलात परवाना नूतनीकर करण्याची तारीख होती. त्यावेळी केवळ 25 नर्सरीच्या मालकांनी परवान्याचे नूतनीकर केले होते. आता राज्यात या नर्सरीची संख्या वाढली आहे.

दै.  पुढारीत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन नर्सरी मालकांनी व्यापार परवाना प्राप्त करण्यास धावपळ सुरू केली आहे. लवकरच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सांगितले.