Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Goa › आता उपआरोग्य केंद्रातही रक्‍त निदान सुविधा

आता उपआरोग्य केंद्रातही रक्‍त निदान सुविधा

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:54PMपणजी : प्रतिनिधी 

रक्‍त निदान सुविधा आता लवकरच राज्यातील  उपआरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध केली जाणार आहे. याबाबतचा  सामंजस्य  करार लवकर केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली. याबाबतची घोषणा मंत्री राणे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटव्दारे केली. येत्या 30 दिवसांत   याविषयीचा सामंजस्य करार  होईल, असेही नमूद केले आहे.

या सुविधेमुळे रुग्णांना आता रक्‍ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा अन्य रक्‍त तपासणी प्रयोगशाळेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही राणे यांनी नमूद केले आहे.   

राज्यातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी   राज्य सरकारकडून  प्रयत्न  सुरू आहेत. त्यानुसार आता लवकर रक्‍त निदान सुविधा उपआरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध केली जाईल.  यासंदर्भात कर्मचार्‍यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिल्यानंतर ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, असेही  मंत्री राणे यांनी म्हटले आहे. 

मागील महिन्यात बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात रक्‍त तपासणी संदर्भातील आय स्टेट मशिन ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली होती. आय स्टेट मशिनमुळे गोमेकॉत येणार्‍या रुग्णांना रक्‍त तपासणीची सुविधा गोमेकॉतच उपलब्ध झाली आहे. यापूर्वी गोमेकॉतील रुग्णांना  रक्‍त तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागत असे.