Wed, Jul 24, 2019 13:01



होमपेज › Goa › ‘गोमेकॉ’तील औषध पुरवठा सरकारला नोटीस

‘गोमेकॉ’तील औषध पुरवठा सरकारला नोटीस

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 1:00AM



पणजी : प्रतिनिधी  

गोमेकॉ इस्पितळात औषधांचा पुरवठा करण्यासंबंधीचे मुंबईस्थित खासगी कंपनीला दिलेले कंत्राट  स्थगित करावे, या मागणीसाठी गोवा आयटकने दाखल केलेल्या  याचिकेवर सोमवारी (दि.23) सुनावणी होऊन  उच्च न्यायालयाने सरकारला बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.     या प्रकरणी पुढील सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर  ठेवण्यात आली आहे. 

आयटकचे नेते अ‍ॅड. सुहास नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएपीएल ही कंपनी मागील 20 वर्षांपासून गोमेकॉत औषध पुरवठा करते. यात सुमारे 193 कामगार काम करतात. या कंपनीचे 74 टक्के शेअर हे केंद्र सरकारकडे तर उर्वरीत 26 टक्के शेअर हे राज्य सरकारकडे आहेत. त्यांच्याकडून चांगली सेवा दिली जात असतानादेखील  सरकारने अचानक त्यांचे कंत्राट काढून घेऊन ते वेलनेस या कंपनीला दिले. नवे कंत्राट देण्यासंबंधीची प्रक्रिया पारदर्शक नव्हती, असा आरोप त्यांनी केला.

सरकारकडून निविदा मागवण्यासाठी जाहिरात गोव्यातील केवळ दोन तर मुंबईतील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. आरोग्य खात्याच्या ई पोर्टलवरदेखील ती नव्हती. इतकी लपवाछपवी का? एखाद्या विशिष्ट कंपनीला लाभ  करुन देण्यासाठी तर हे सर्व करण्यात आले नाही ना, असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. जीएपीएलकडून कंत्राट काढून घेण्यात आल्याने त्यात काम करणार्‍या कामगारांच्या भवितव्याचादेखील प्रश्‍न उपस्थित झाला असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Tags : goa, goa medical collage and hospital, gomeco