Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Goa › ‘आधार कार्ड’ची दूतावासात सोय करावी

‘आधार कार्ड’ची दूतावासात सोय करावी

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 1:22AMपणजी : प्रतिनिधी

सर्व अनिवासी भारतीयांना आधार कार्ड मिळण्यासाठी सगळ्या देशातील दूतावासांमध्ये सोय करावी, अशी मागणी गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पाठवलेल्या लेखी पत्रात केली आहे. 

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, भारतीय नागरिकांना आधार कार्ड तयार करणे बंधनकारक असून ते दिलेल्या मुदतीत न बनविल्यास त्यांची बँक खाती कार्यरत हेाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी विदेशातून आपल्या राज्यात सर्वांना येणे शक्य नाही. याशिवाय सर्व सरकारी आर्थिक व्यवहारात अनिवासी भारतीयांना ‘पॅन कार्ड’ सादर करणेही आवश्यक करणे चुकीचे असून अन्य कोणतेही  ओळखपत्र अथवा पासपोर्टची प्रत जोडण्याची मोकळीक द्यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. या विषयाबाबत आपण केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून त्यात आधारकार्ड संबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी केली असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.