Thu, Nov 22, 2018 00:35होमपेज › Goa › 24 ठिकाणी नो सेल्फी

24 ठिकाणी नो सेल्फी

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील किनारपट्टी भागात सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावण्याच्या प्रकारात वाढ झाली असून त्याला आळा घालण्यासाठी  ‘दृष्टी मरीन’ने सुमारे  24 असुरक्षित ठिकाणांवर ‘नो-सेल्फी’ झोनचे फलक लावण्याचे ठरविले आहे. राज्य सरकार नियुक्‍त ‘दृष्टी मरीन’ उत्तर गोव्यातील बागा नदी, दोनापावला जेटी, सिकेरी किल्ला, हणजूण, वागातोर, मोरजी, आश्वे, हरमल, केरी, बांबोळी आणि शिरदोण या ठिकाणी फलक लावणार आहे. दक्षिण गोव्यातील आंगोद, बोगमाळो, होलांत, बायणा, जापनिज बाग, बेतुल, खणगणी, पाळोळे, खोला, काब-द-रामा, पोळे, गालजीबाग, तळपण व राजबाग या ठिकाणीही फलक लावणार आहेत.