Tue, May 21, 2019 19:03होमपेज › Goa › बेकायदा घरांना अभय नाही : मुख्यमंत्री पर्रीकर

बेकायदा घरांना अभय नाही : मुख्यमंत्री पर्रीकर

Published On: Feb 07 2018 1:37AM | Last Updated: Feb 07 2018 12:10AMमडगाव : प्रतिनिधी

सरकार  बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देणार नाही.त्यामुळे कोणत्याही अवस्थेत 28 फेब्रुवारी 2014 नंतर बांधलेल्या घरांना सरकार अभय देऊ शकणार नाही. ती घरे पाडली जातीलच असे स्पष्ट करून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पेडामळ शिरवई भागात बेकायदेशीर पणे उभारण्यात आलेल्या घरांच्या प्रकरणावर पडदा टाकला आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या जमिनीत किंवा कायदेशीर जमिनीत घरे बांधलेली आहेत, त्यांनी 31 मार्च 2018 पर्यत दहा हजार रुपये सरकार दरबारी भरावेत, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंगळवारी कुडचडे भागाचा दौरा केला दौर्‍याला सुरुवात करताना त्यांनी आमदार निलेश काब्राल व इतर कार्यकर्त्यांसह शिरवईच्या  पेडामळ येथील साईबाबा मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले.त्यानंतर स्थानिकांशी विविध विषयांवर चर्चा केली.पेडामळ येथील कोमुनिदादच्या जागेत बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या बांधकामा विषयीही चर्चा करण्यात आली. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले,की घरांच्या बाबतीत खुलासा करतांना 28 फेब्रुवारी 2014 नंतर च्या घरांना सरकार कोणत्याही परिस्थितीत वाचवणार नाही.स्वतःच्या जागेत घर बांधलेल्यांनी आपल्या फाईल नगर नियोजन खात्याकडे पाठवल्या आहेत पण नियमानुसार दहा हजारांचे शुल्क भरलेले नाही ते शुल्क 31 मार्च पर्यंत भरावे. त्यांचे विषय सहा महिन्यांच्या कालावधीत सोडवले जातील, असे  पर्रीकर यांनी सांगितले.

लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले,  घर उभारण्यासाठीची सध्याची प्रक्रिया किचकट आहे.  ही प्रक्रिया सुटसुटीत केली जाईल. 

पीपल अगेन्स्ट कोल या संघटनेला कोण निधी पुरवतो याची चौकशी करून त्यांच्यावर विश्‍वास ठेवायचा की नाही याचा निर्णय घ्या.कोळश्याचे प्रदूषण वास्कोला होते. या भागात तर खाणी धुळीचे प्रदूषण जास्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सरकार लोकांना शौचालये उपलब्ध करून देणार आहे त्या साठी.लाभार्थ्यांना कमीत कमी पैसे भरावे लागणार आहेत.पुढील महिन्या काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू होईल याचे श्रेय आमदार काब्राल याना जात असल्याचे ते म्हणाले .अनेकांनी याविषयात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता असे मुख्यमंत्री म्हणाले.पंचायतीने सांडपाणी, कचर्‍याचा विषयावर लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. आम्हाला  90 टक्के वीज कोळशातून प्राप्त होते.रायचूर,छत्तीसगड, आंध्रप्रदेश येथून कोळसा येतो त्याचे प्रदूषण त्या राज्यांना व्हायला हवे.पंचयतींनी नको त्या विषयांना प्राधान्य देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार निलेश काब्राल  म्हणाले,की पूर्वी पेडामळ भागात स्थानिकांची घरे होती.नंतर आणखी काही घरे झाली अनेकवेळा सांगून सुद्धा लोकांनी इतरांना घरे उभारण्यापासून अडवले नाही.आणखी घरे निर्माण झाल्याने पाणी आणि  वीज समस्या निर्माण झाली आहे.