Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Goa › अंमलीपदार्थप्रकरणी नायजेरीयनास अटक

अंमलीपदार्थप्रकरणी नायजेरीयनास अटक

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:01AMपणजी : प्रतिनिधी

कळंगुट येथे अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून कोकेन, गांजा, तसेच एलएसडी असा सुमारे 2.50 लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नायजेरीयन नागरिक आगुस्तीन अनेफो (30) याला अटक केली.

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने   दिलेल्या माहितीनुसार, या कारवाई दरम्यान तो वापरत असलेली एक दुचाकीही जप्‍त केली. बुधवारी (दि.22)  मध्यरात्री 1.30 ते पहाटे 4.30 वाजेदरम्यान बागा कळंगुट येथे ही कारवाई करण्यात आली. 

यावेळी त्याच्याकडून 10.35 ग्रॅम कोकेन, 4.015 ग्रॅम एलएसडी  व 172.170 ग्रॅम गांजा मिळून  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 2.50 लाख रुपये किंमतीचा अमलीपदार्थ जप्‍त केला. संशयित आगुस्तीन याच्या विरोधीत अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.