होमपेज › Goa › ‘संजीवनी’ला देणार नवसंजीवनी : मंत्री विजय सरदेसाई

‘संजीवनी’ला देणार नवसंजीवनी : मंत्री विजय सरदेसाई

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 14 2018 11:28PMफोंडा : प्रतिनिधी

खाण बंदीची सावर्डे मतदारसंघाला अधिक झळ बसली असून खाणी लवकर सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. तसेच संजीवनी साखर कारखान्याला राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नगर विकासमंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांना दिली.

मंत्री विजय सरदेसाई, मंत्री विनोद पालयेकर, मंत्री जयेश साळगावकर व आ. दीपक पाऊसकर यांनी शुक्रवारी दिवसभर सावर्डे मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर संध्याकाळी संजीवनी साखर कारखान्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री विजय सरदेसाई बोलत होते. यावेळी सावर्डे मतदार संघातील विविध पंचायतीच्या सरपंचांनी आपापल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या.खाणबंदीची अधिक झळ सावर्डे मतदारसंघातील लोकांना बसली असून खाणींची दारे बंद झाल्याने लोकांनी कृषी क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे. खाणी सुरू करण्यात सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करीत आहे. 

सावर्डे मतदारसंघात कृषी  क्षेत्राला चालना दिल्यास त्याचा चांगला  परिणाम दिसून येईल. संजीवनी साखर कारखान्याला नवसंजीवनी देताना स्थानिकांना नोकर्‍या उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच संजीवनी साखर कारखान्यात कोल्ड स्टोरेज करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील  असल्याचेही मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.फातोर्डा मतदारसंघात ट्रक टर्मिनल उभारण्यास आपला विरोध होता. मात्र सावर्डे मतदारसंघात ट्रक टर्मिनल उभारल्यास त्याचा अधिक लाभ स्थानिकांना होणार असल्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. 

Tags : Goa, New, life,  sanjevani, said,  minister, vijay sardesai